आमच्या बद्दल

कै. हनुमंत महांगडे व श्री विजय कासुर्डे हे मुंबईत नोकरीसाठी आले होते. नोकरी मिळाल्यानंतर ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांचा सहवास लाभला. ते एक महान कर्मयोगी होते. त्यांचाकडून मिळालेल्या संस्कारातूनच आपणहि समाजासाठी काय तरी करावं अशी प्रेरणा मिळाली व मुंबई बाहेरून मुंबई मध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी आम्ही कार्य करू लागलो.


१९९२ साली श्री विजय कासुर्डे यांची ओळख ह. भ. प. श्री पांडुरंग महाराज घुले, संस्थापक - शिल्पकार श्री.गाथा मंदिर देहू (पुणे) यांच्याशी झाली व यातूनच श्री विजय कासुर्डे हे १९९२ साली पायीवारीसाठी ह. भ. प. श्री पांडुरंग महाराज घुले यांच्याबरोबर गेले. तेथे पायी चालत असताना भाविकांना पावसाळी वातावरणामुळे होणाऱ्या छोट्या - मोठ्या तक्रारी लक्षात आल्या.


१९९३ च्या वारी पूर्वी ह. भ. प. घुले महाराजचे मार्गदर्शन घेऊन कै. महांगडे यांच्याशी चर्चा करून जेजुरी दरम्यान एका छोट्या जीप मध्ये थोडीफार औषधें घेऊन कै. महांगडे व सुरेश मानकुमटे हे मौफत आरोग्य सेवेसाठी दाखल झाले व सोबत डॉ सौ संगीता मोहिते त्यांचे पती दीपक मोहिते हे हि होते सेवेकरी म्हणून ह भ प रंगनाथ हांडे हे होते

पुढे वाचा

विनामूल्य वैद्यकीय सेवा


फेसबुक जाहिराती

आषाढी वारी २०१९