आमच्या बद्दल


कै. हनुमंत महांगडे व श्री विजय कासुर्डे हे मुंबईत नोकरीसाठी आले होते. नोकरी मिळाल्यानंतर ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांचा सहवास लाभला. ते एक महान कर्मयोगी होते. त्यांचाकडून मिळालेल्या संस्कारातूनच आपणहि समाजासाठी काय तरी करावं अशी प्रेरणा मिळाली व मुंबई बाहेरून मुंबई मध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी आम्ही कार्य करू लागलो.
१९९२ साली श्री विजय कासुर्डे यांची ओळख ह. भ. प. श्री पांडुरंग महाराज घुले, संस्थापक - शिल्पकार श्री.गाथा मंदिर देहू (पुणे) यांच्याशी झाली व यातूनच श्री विजय कासुर्डे हे १९९२ साली पायीवारीसाठी ह. भ. प. श्री पांडुरंग महाराज घुले यांच्याबरोबर गेले. तेथे पायी चालत असताना भाविकांना पावसाळी वातावरणामुळे होणाऱ्या छोट्या - मोठ्या तक्रारी लक्षात आल्या.
१९९३ च्या वारी पूर्वी ह. भ. प. घुले महाराजचे मार्गदर्शन घेऊन कै. महांगडे यांच्याशी चर्चा करून जेजुरी दरम्यान एका छोट्या जीप मध्ये थोडीफार औषधें घेऊन कै. महांगडे व सुरेश मानकुमटे हे मौफत आरोग्य सेवेसाठी दाखल झाले व सोबत डॉ सौ संगीता मोहिते त्यांचे पती दीपक मोहिते हे हि होते सेवेकरी म्हणून ह भ प रंगनाथ हांडे हे होते या कामी मुंबईतील श्री विजय बड़े यांनी त्यांची जीप विनामूल्य देऊ केली मात्र लोणंद दरम्यान औषधे संपली व तेथून परत यावे लागले
मुंबई मधे आल्यावर १९९४ सालासाठी पूर्वीच्या अनुभवानुसार जय्यत तैयारी करण्याचे ठरविले व कै महांगडे यांनी श्री दीपक मोहिते यांच्याशी चर्चा करुण पूर्ण वारीमधे म्हणजे साधारण १५ दिवसांसाठी पुरतील एवढी औषधे तसेच १५ दिवस टप्पा टप्प्याने येतेल अशी वैद्यकीय पथके तसेच कार्य त्यांच नियोजन केल व त्याप्रमाणे १९९६ साली श्री अनंत मोहिते साहेब अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मदत घेऊन पुरेशी औषधि जमवली तसेच डॉ सौ संगीता मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथके टायर करुण १९९४ सालची वारी यशस्वी केली १९९५ साली मात्र अन्न व् औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयातील श्री अनंत मोहिते साहेब यांच्या संपर्कातील श्री मधुकर पोरे व श्री वसंतराव कदम हे दोन्ही अधिकारी वारीत सेवेसाठी दाखल झाले
१९९५ साली त्यांनी सर्व आवश्यक बाबींचा रीतसर अभ्यास करुण १९९६ साली शिस्तबद्ध सर्व सुख सोयी युक्त अशी व्यवस्था करुण मोफत आरोग्य सेवेचे हे कार्य अतिशय जोमाने पार पाडले त्याच दरम्यान वारीसाठी सेवेत आलेले डॉ सुनील हालुरकर डॉ प्रदीप पाटील व त्यांचे सहकारी मित्र परिवार वारीसाठी आले व् तेथून पुढे के कार्य दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे होऊ लागले
आता संस्था फक्त वारी पुरतेच काम करत होती मात्र १९९६ साली संस्थेचे वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई असे नामकरण होऊन चैरिटी कमिशनर मुंबई यांचे कार्यालयात रीतसर नोंदणी होऊन वर्षभर मोफत आरोग्य सेवेची मोफत आरोग्य शिबिर घेऊ लागली.
श्री महालक्ष्मी मंदिर येथे तत्कालीन श्री जाधव साहेब मुख्य व्यवस्थापक पाध्ये साहेब व्यवस्थापक यांचे मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सवाचे दरम्यान सुरक्षा व्यवस्था पानी वाटप व् सेवेच्या इतर बऱ्याच कार्यामधे संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते भाग घेऊ लागले तसेच पुढे मुंबादेवी मंदिर येथे वर्षभर चालण्याऱ्या उत्सवातून भाग घेऊ लागले श्री सिद्धिविनायक मंदिर येथे देखी अंगारकी चतुर्थी दरम्यान सुरक्षा चप्पल स्टैंड व् अम्ब्युलन्स सेवेचे कामी विनामूल्य सेवा देऊ लागलो
आषाढ़ी वारी दरम्यान सुरुवातीचे काळात आमच्या मोफत आरोग्य सेवेच्या पथासाठी शेडगे दिंडी न ३ रथापुढे हे भोजन व्यवस्था पाहत असत नंतर संस्थेच्या पुढील वाटचालीत भोजन व्यवस्था पोरे व कदम यांचे मार्गदर्शनाखाली आम्हीच करू लागलो
सुरुवातीच्या काळात संस्थेकडे अम्बुलेंस न्हवती तेव्हा मुंबईतील विशाल जुन्नर सहकारी संस्थेने ख़ास वारीचे कार्य पाहून त्यांची अम्बुलेंस आम्हाला विनामूल्य दिली मात्र टी पुरेशी नसल्याने आणखी एक अम्ब्युलन्स हवी म्हणून शोध घेतला असता मशीद बन्दर येथे शिवप्रताप मित्र मंडळ यांचे सर्वेसर्वा श्री प्रभाकर कोबेकर याची भेट झाली व त्यांना विनंती केल्यावर त्यांनी त्याच्या सहकार्याशी बोलून त्याची अम्ब्युलन्स वारी कालावधीसाठी देऊ केली नंतर कालांतराने त्याच्या काही अडचणींमुळे काढून टाकली व तद नंतर मुंबईतील श्री ज्ञानेश्वर भाई वांगडे संस्थापक शिवसहयाद्री सहकारी पतसंस्था मुंबई यांच्याकडे आम्ही गेलो व वारी कालावधीसाठी मागितली भाई नी कसलाही विचार न करता ताबड़तोब विनंती मान्य केली व तेव्हापासून आजतागायत वारी कालावधीमधे त्यांची अम्बुलेंस विनामूल्य येत असते
पुढे २००८ साली सनातन धर्म संस्था चेम्बूर या संस्थेच्या माध्यमातून एक अम्बुलेंस संस्थेस दान म्हणून मिळाली या कामी सनातन संस्थेचे चेयरमैन श्रीमान शिवकुमार जी व समाजसेवक श्रीमान कप्तान गर्ग साहेब चेम्बूर यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले तसेच २००८ साली श्री पोरे व कदम यांच्या अथक प्रयत्नातून श्री जगन्नाथ शिंदे अध्यक्ष मुंबई यांच्या माध्यमातून टाटा कंपनीची मोठी अम्ब्युलन्स दान म्हणून मिळाली हळू हळू संस्था बऱ्याच बाबींमधे स्थिर हो लागली
संस्थेस स्वतःचे कार्यालय न्हवते औषध साठ्यासाठी गोडाउन न्हवते मात्र पुढे ह भ प पांडुरंग महाराज घुले यांनी त्याच्या श्री क्षेत्र देहु येथील श्री गाथा मंदिर मधील १२०० चौ फुटाचा एक हॉल औषध साठ्यासाठी खुला करुण दिला तसेच मुंबईतील श्री पोरे व् त्यांची कन्या सौ सारिका कांगराळकर हिच्या व श्री राकेश थवानी यांच्या प्रयत्नातून संस्थेस आमदार तारा सिंग यांच्या निधीतून बांधलेले गव्हानपाड़ा मुलुंड पूर्व येथे एक छोटेसे कार्यालय वापरण्यासाठी मिळाले आणि संस्थेचे कार्य आणखीन जोमाने वाधु लागले गेली अनेक वर्ष डॉ सुनील हळुरकर व सुषमा तसेच डॉ मोरे डॉ करपे यांच्या मदतीने खालील ठिकाणी मोफत आरोग्य चिकित्सा व मोफत औषधोपचार केंद्र चालु आहेत
 • १. श्री महालक्ष्मी मंदिर भूलाभाई देसाई रोड महालक्ष्मी येथे प्रत्येक शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता

 • २. एम् पी ऐल मिल कंपाउंड ताड़देव येथे प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३. ०० ते ५. ०० वाजता

 • ३. प्रत्येक मंगळवारी श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथे दुपारी ३ ते ६ वाजता

 • ४. प्रत्येक शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत श्री मुंबादेवी मंदिर जवेरी बाजार मुंबई या मोफत आरोग्य सेवे व्यतिरिक्त या तिन्ही ठिकाणी वेळोवेळी आवश्यक सेवेसाठी कार्यकर्त्यांचे योगदान असते

 • ५. तसेच प्रत्येक माणगाव वाडी नेरल माथेरान रोडवरील मधुराम चैरिटेबल ट्रस्ट आश्रम शाळेत ४५० विद्यांर्थासाठी डॉ अरुण काले व् त्यांच्या पत्नी डॉ सौ काले यांच्याकडून मोफत चिकित्सा करुण मोफत औषधाचे वाटप केले जाते

 • ६. श्री क्षेत्र देहु येथे श्री गाथा मंदिरातील दवाखान्यात डॉ देशमुख पुणे हे त्यांच्या सहकाऱ्यान बरोबर प्रत्येक बुधवारी १ ते ५ वाजेपर्यंत मोफत आर्युर्वेदिक चिकित्सालय व् औषधालय चालवीत असतात
 • 7.वैष्णव भवन कुर्ला दवाखान्यात डॉ. प्रदीप पाटील त्यांच्या सहकाऱ्यान बरोबर सोमवार ते शनिवार दुपारी १. ०० ते ३. ०० वाजेपर्यंत धर्मादाय शुल्क औषधालय चालवीत असतात
 • संस्था स्थापनेवेळी १९९६ ते २००४ खालील विश्वस्त मंडळ होते

  विजय श्रीपती कासुर्डे

  सुरेश ल. मानकुमरे

  विलास येवले

  डॉ गौरीशंकर महादेव घोरपड़े


  शिवराम गावड़े

  राजेंद्र दिनकर कळंबे

  हनुमंताराव सकपाळ

  दीपक शंकर मोहिते


  स्व. अनंत मोहिते

  स्व. हनुमंत आनंदा महांगडे

  स्व. हरीश शंकर धनावड़े


  सन २००४ ते आजपर्यंत कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ

  विजय श्रीपती कासुर्डे अध्यक्ष

  वि. डी. कदम उपाध्यक्ष

  सुरेश ल. मानकुमरे

  श्री प्रभाकर एस कोंबेकर


  श्री डॉ सुनील द हळुरकर

  श्रीराम खाशाबा नलावडे

  ऑड दादासाहेब तू खरमाटे

  श्री डॉ प्रदीप ध पाटील


  श्री संदीप बा गावड़े

  श्री अशोक स आहेर

  संस्थेस आजपर्यंत औषधाची मदत करणाऱ्या मुंबई पुणे व नाशिक येथील औषध कंपन्या होत संस्थेस आजपर्यंत भरीव आर्थिक व् अम्बुलेंस स्वरुपात मदत करणाऱ्या संस्था


  हयात नसलेले विश्वस्त