सेवेकरी

ईश्वरी सेवेतून रुग्णसेवेचे व्रत स्वीकारलेल्या वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिम्मित आपल्याशी संपर्क साधताना आम्हांस विशेष आनंद होत आहे गेली २५ वर्षे सातत्याने पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यासाठी विविध प्रकारची आरोग्य सेवा देण्याचे कार्य करीत आहोत त्यामध्ये सामान्य वारकऱ्याबरोबरच जीज्ञासू , अभ्यासक अशाचाही मोठा सहभाग असतो समाजाला अध्यात्तमाच्या मार्गावर एकसंघ ठेवणारा हा विलोभनिय सोहळा विश्वबंधुत्वची भावना दृढ करणारा आहे वारीतील या आरोग्यसेवेबरोबरच ट्रस्टतर्फ़े वर्षभर ग्रामीण आणि आदिवासी भागाची आरोग्य शिबिरे घेतली जातात गेल्या पंचवीस वर्षात लाखो रुपयापेक्षा जास्त औषधांचे वितरण करून पंचवीस लाख रुग्णाची सेवा केल्या जातात आपणांस सुद्धा या ट्रस्टसाठी काम करावयाचे असल्यास आमच्याशी थेट संपर्क साधावा